नाशिक रिअल इस्टेट क्षेत्र हे नाशिक करिताच धोकादायक बनले आहे | “Real Estate” Of Nashik Has Become The “Real Threat” For Nashik

नाशिक जिल्ह्यातील सुंदर जमीन स्वतः नाशिकच्या भविष्यासाठी धोकादायक बनली आहे. महापालिकेच्या उत्पन्नात झालेली घट दाखवीत आहे कि नाशिक मधील मोठ्या कंपन्या व उद्योग झपाट्याने नाशिक जिल्ह्या बाहेर आपले अस्तित्व निर्माण करीत आहेत. तसेच नवीन उद्योग नाशिकमध्ये येऊन आपले अस्तित्व उभारू शकत नाहीत कारण येथील जमीनिची वास्तविक किंमत हि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जमीन दरा पेक्षा किमान ५ पटीने जास्त आहे, त्यामुळे नवीन उद्योग उभारणे अडचणीचे व अशक्य होत चालले आहे.

शहरातील जमीन मालकांनी नाशिकमध्ये व नाशिकच्या सभोवतालातील सुमारे किमान २५ किमी त्रिज्येच्या भागात एकही जमीन रिकामी व उद्योगासाठी सोडलेली नाही. आपणास माहित आहे कि अनधिकृतपणे या मोठ्या जमिनीचे मालक हे नाशिकचे काही श्रीमंत लोक आहेत, पण ते नाशिकच्या प्रमुख २५ कर दत्यामध्ये कधीही कर चुकविताना कुठेही दिसणार नाहीत. महत्वाची गोष्ट म्हणजे या जमिनींच्या मालकीमध्ये काही विद्यमान राजकारणी लोकांची प्रमुख भागीदारी आहे, म्हणून हे राजकारणी काही केल्या अधिकाधिक जमिनी संपादन व खरेदी करण्याचे थांबवू शकणार नाहीत. ह्यांच्या मनात जमिनीचे मोह इतके अधिक आहे, कि ते १ नवीन पैसा सुद्धा कारखान्यांसाठी किंवा इतर उद्योगांमध्ये गुंतवत नाही. आज परिस्तिथी अशी निर्माण झालेली आहे कि या श्रीमंत भूखंड मालकांच्याच मुला मुलींना नौकरी मिळणे अशक्य झाले आहे. नाशिकच्या श्रीमंत लोकांनी आपली मानसिकता जर नाही बदलली, तर नाशिक मधून युवकांना पलायन करावे लगेल.

केंद्र शासनाकडून नवीन उद्योग व कारखाने सुरु करणाऱ्या युवकांना गुंतवणूक मिळावी, यासाठी मी जोरदार प्रयत्न करणार. स्थानिक श्रीमंतांची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न देखील करणार, पण नवयुवकांनी स्वतः आपल्या पालकांना त्यांची जमिनीतील गुंतवणुकीची मानसिकता बदलालयला भाग पाडले पहिजे. नाशिक मधील विविध झोनमध्ये (मोठे भूखंड) काही छोटे भूखंड किंवा जमिनीचा तुकडा हा औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात यावा हे माझे मुख्य ध्येय असेल, कारण अश्याप्रकारचे झोन व भूखंड आरक्षण केल्याशिवाय नाशिकमध्ये उद्योग वाढीसाठी मदत होणार नाही व त्यामुळे नाशिक मध्ये उद्योग लोप पावत जातील. मला माहित आहे कि मला अशा श्रीमंत लोकांकडून तीव्र विरोध होईल, पण मी (डॉ. प्रदीपचंद्र पवार) नाशिकच्या वाढीसाठी बांधील आहे व मी ठामपणे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात विकास घडवून आणेल. आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य अतिशय सुखकर बनविण्यासाठी मला साथ हवी आहे नाशिक मधील प्रत्येक सर्व सामान्य लोकांच्या समर्थनाची, याचा उपयोग नाशिक मधील औद्योगिक क्षेत्र बळकट करण्यासाठी नक्कीच होईल.
real-threat-real-estate
“Real Estate” Of Nashik Has Become The “Real Threat” For Nashik

The beautiful land of Nashik district has in itself become the threat for future of Nashik. The decline in revenues of NMC shows that the industries are moving out of Nashik and the new industries cannot afford to come and set up their industries in Nashik, as the actual cost of land in industrial area is at least 5 times more than the MIDC rates in that zone.

Land Bankers have left no land in or around Nashik, at least in the radius of 25 Kms. Unofficially, we know that some of these Land Bankers are the richest people of Nashik, but they don’t appear anywhere in the top 25 Tax payers from Nashik. Some existing heavyweight politicians have partnered with the land bankers, so they won’t do anything to stop this growing practice of land acquisition by the land bankers. Greed of these land bankers has increased to such an extent, that they don’t invest even a single penny in any factory or company. Today we have such a serious problem that even the son and daughters of these rich people are not getting employment and they also don’t want to do the land business. If rich people of Nashik don’t change their investment strategy, then we will get in deep trouble and the youth of Nashik will need to migrate elsewhere.

I will take efforts in getting financial assistance from central government for new industries and youth who start new business. I will also try to influence local landlords to change their mindset, but youth should also convince their parents to change their mindset for survival, growth and success of our city.

It will be the mission of your Dr. Pradeepchandra Pawar to get various industrial zones declared for pockets of lands around Nashik. Without having such zones and reservations for industries, Nashik cannot grow. I will get severe opposition from such rich people, but I am committed for growth of Nashik. I expect support of common people of Nashik to safeguard future of Nashik and generations to come.
— with Prakash Nikumbh, Rajendrasingh Chauhan, Adv Gitesh Tanajirao Bankar and 46 others at Nashik.

Leave a Reply