१. बेरोजगारी : सध्याची बेरोजगारी हाच माझ्यासाठी आणि मनसेसाठी  सगळ्यात मोठ्ठा विषय आहे. लवकरात लवकर नाशिकमध्ये काही मोठ्या कंपन्या घेऊन येण्याचे माझे ध्येय आहे, राज साहेबांचे  टाटा, Reliance सारख्या मोठ्या कंपन्यांच्या काही अधिकाऱ्यांशी  चांगले संबंध आहेत, त्यामुळेच गोदापार्क आपल्याला मोफत बनवून मिळत आहे. येणारे मोदी सरकार उद्योग आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगले असेल, त्यामुळे राज साहेबांकडून जोर लावून काही मोठ्ठे उद्योग मी नाशिकला घेऊन येणार. माझ्या आणि आमच्या अमदारांच्या अध्यक्षेत NIMA, AIMA आणि MACCI च्या पदाधिकाऱ्यांची भेट ह्या मोठ्या कंपन्यां बरोबर घडवून आणणार आणि नाशिकच्या बेरोजगार तरुणांना रोजगारची संधी मिळेल. कुठलेही २ मोठ्ठे उद्योग नाशिकमध्ये आल्यास, त्यांच्या मागे कमीत कमीत १००० छोटे उद्योग सुरु होतील. नाशिकच्या लाखो तरुणांना रोजगार मिळेल.

२. स्मार्ट सिटी : श्री. नरेंद्र मोदी यांच्या विधानानुसार 100 स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास आहे, त्याची प्रक्रिया त्यांचे सरकार आल्यावर तात्काळ अमलात आणण्यात येईल. मी तुम्हाला खात्री देतो की, त्या १०० स्मार्ट शहरांच्या यादीतील एक शहर हे नाशिक असेल व त्यामुळे क्रेंदातुन मोठ्ठा निधी हा नाशिकच्या विकासासाठी मी आणणार. ह्यामुळे नाशिक हे मोठ्या शहरांना फौरलेन हायवे ने जोडले जाईल आणि पुणे, इंदोर, सूरत हयासारख्या  शहारांना जलद गतीच्या हायवे ने जोडले जाणार आणि त्यामुळे नाशिकच्या विकासाला मोठ्ठा हातभार लागेल.

३. जीवनदायी आरोग्य योजना : आपल्या जिल्ह्यातील सर्व नारंगी आणि पिवळा राशन कार्डधारक नागरिकांना केंद्र शाश्नाकडून कुठल्याही आजारावर प्रतिव्यक्ती ३ लाख रुपयांपर्यंत चा वार्षिक खर्च नाशिमधील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मिळावा ह्यासाठी नाशिकमधील कमीत कमी १० चांगल्या रुग्णालयांचे नोंदणीकरण करून घेणार. लवकरच आपल्या जिल्हातील ८०% लोकांना नाशिकमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. कुठल्याही व्यक्तीला आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपल्या आजारावर इलाज न करून घेण्याची वेळ येऊ नये, ह्य्साठी मी नक्कीच नाशिकमधील जास्तीत जास्त रुग्णालयांमध्ये ही सुविधा १२ महिन्याच्या आंत मिळवेन.

४. गोदावरी शुद्धीकरण : मागच्या १० वर्षात सांडपाणी मिसळून नाशिक शहरात गोदावरीची अवस्था वाईट करण्यात आली आहे, सध्याच्या राज्य सरकारने इंडियाबुल्स चे आवेदन(नाशिकचे सांडपाणी उचलून सिन्नरला नेण्याचे) अस्वीकार केल्यामुळे गोदावरी स्वच्छ करण्यात विलंब होत आहे, १२ महिन्याच्या आंत गोदावरी सांडपाणी मुक्त करण्याचे माझे ध्येय आहे.

५. सुरत – नाशिक – पुणे आणि नाशिक – इंदोर रेल्वे : नाशिकला लवकरात लवकर इंदोर, सुरत आणि पुण्याबरोबर रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी नवीन रेल्वे मंत्रींबरोबर पाठपुरावा करून रेल्वे चे काम पुढच्या ५ वर्षात करून घेण्याचे माझे मानस आहे.

६. एलीवेटेड कॉरीडोर खाली नवीन अंडरपास आणि नवीन फ्लाईओवर : कमोद नगर, सिडको, डी.जी.पी नगर २, द्वारका, जत्रा हॉटेल ह्या सर्व ठिकाणी नागरिकांचे हाल होत आहेत, लवकरात लवकर नागरिकांच्या सोबत NHAI च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नवीन अंडरपास आणि जिथे नवीन फ्लाईओवर ची गरज आहे, तिथे नवीन फ्लाईओवर करून घेण्याचे माझे ध्येय आहे.

७. पोलीहाउस साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वाढीव सबसिडी मिळवणे : नाशिक जिल्हा भारतातील सर्वात जास्त फळ आणि महत्वाच्या भाज्या उगवणारा जिल्हा आहे, शेतकऱ्यांना पोल्लीहाउस साठी ९०% सबसिडी मिळावी ह्यासाठी मी नवीन कृषी मंत्रींबरोबर पाठपुरावा करणार.

८. आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, औषधी उत्पादन व शेती उत्पादन(एग्रो) : नाशिक जिल्ह्यात १५०० एकर भूकंड नवीन कंपन्यांसाठी आरक्षित करून घेण्याचे माझे मानस आहे, शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होऊ नये, म्हणून ज्या शेत्रात शेती होत नाही अशेच शेत्र आरक्षित करून घेण्यात येईल. जर कुठे शेतकऱ्यांची जागा घ्यावी लागली, तर त्यांना १५% जागा पुन्हा विकसित करून हस्तांतरीत केली जाणार.

९. बड्या आई.टी. कंपनी नाशिक मध्ये आणणे : मी २ मोठ्या अमेरिकी आई.टी. नाशिकमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहे, सध्या त्यांना पाहिजे असलेल्या भावात जागा मिळत नाहीए, पण MIDC च्या मदतीने लवकरात लवकर त्यांना जागा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

१०. वाई-फाई कनेक्टीविटी : संपूर्ण नाशिक, सिन्नर मधील स्टेन्ड आणि कॉलेज परिसर, घोटी स्टेन्ड, रेल्वे स्टेशन परिसर आणि कॉलेज परिसर, त्रिंबकेश्वर स्टेन्ड आणि कॉलेज परिसर “free WI-FI zone” करण्याचे माझे ध्येय असेल. स्वबळावर काही करण्याची इच्छा असलेया तरुणांना ह्याचा भरपूर फायेदा होईल.

११. 4G सेवा सुरु करणे : रीलायन्स जियो आणि  बी.एस.एन.एल पाठोपाठ नाशिक जिल्ह्यामध्ये इतर कंपन्याची सुद्धा 4G सेवा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी माझ्यावतीने सर्वतोपरी मदत करणार.

१२. विमान सेवा : नाशिक पासून दिल्ली, बंगळूरू, पुणे, गोवा सारख्या महत्वाच्या शहरांपर्यंत विमानसेवा लवकरात लवकर सुरु करण्यास माझी प्राथमिकता असेल, मोठ्ठे उद्योग शहरात येण्यासाठी विमानसेवा अत्यंत आवश्यक आहे. नाशिकच्या विमानतळाचे राष्ट्रीय उड्डाण आयोगाकडून लवकरात लवकर नोंदणीकरण करणे आवश्यक आहे, त्यानंतर विमासेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांची नाशिक विमानतळाला भेट राज साहेबांच्या मदतीने घडवून आणण्याचा माझा मानस आहे.

 1. Sandip B says:

  Mr. Pawar tell something new, have of these agendas are already in progress, what new things you are going to do?? , You are ssaying Mr Thackeray has relations with industrialist, then why he didn’t try till date?? 3 MLAS are there from your party are they sleeping for four years as of now, dont fool us our agenda is clear abki bar Modi Sarkar….

 2. atul says:

  Dear Dr. Pawar,
  I see everyday on TV that your spokesperson have no answer, when SS people ask you why are you contesting in Maharashtra against Modi when its going to split the votes. I dont understand why dont you question back with the fact that Shivsena candidates are contesting in Punjab, UP against the BJP?

  As per this report (http://www.hindustantimes.com/punjab/chandigarh/on-penultimate-day-150-candidates-file-nominations/article1-1205505.aspx. ) Shivsena has put in nominations at least in Jalandar.

  Does it not mean SS is helping in defeating BJP-SAD in Punjab brings NDA getting 272?

 3. Sanket Babre says:

  Dear Sir,
  This is Sanket Babre. Originally I belong to Thane city, but currently I am a permanent resident of New Zealand.

  First foremost , I have been supporting Mr Raj Thackeray since his bhartiya vidyarthi sena days. I am a proud maharashtrian and a very staunch supporter of Maharashtra Navnirman sena.

  Initially I would like to wish you best of luck for the upcoming lok sabha elections. I hope you triumph with a thumping majority.

  Being a proud Maharashtrian , I am bit concerned about the party deviating from the core principle of the “marathi asmita”. I truly understand that , we are talking about the national elections. But why were you or the party activists required to use Mr. Modi’s photo on your campaign posters. Further , the content written on the poster was in gujarati. I was certainly shocked and to a certain extent saddened to see such kind of tactics applied to lure the gujarati voters. Aren’t we contradicting our party’s principle by indulging in such kind of strategies? When Mr Thackeray says , that he wishes to promote the marathi language, isn’t the above tactic completely opposite ?

  Dr.Pawar , you are a highly respected entity in the entire Nashik City. And we all do trust your political will . But I also urge you to look into the above issue and undertake the possible measures at the earliest.

  Sincerely,
  Sanket Babre

  • Dr. Pradeepchandra Pawar says:

   Hi Sanket !

   some of our party workers did that, but as soon as we got to know about it, we stopped them from further distributing the banners and posters. as such we’ve enjoyed very good relationship with the Gujarati’s lliving in Maharashtra. Raj saheb clearly mentioned that our only problem is with criminal’s coming from UP and Bihar. you need to know that the Men who raped Nirbhaya in Delhi were all from Bihar and UP.

   • Sanket Babre says:

    Dear Sir,
    I fully support the party’s stand against the criminals coming to our state from UP and Bihar. It has to be stopped.

    Sir, Many thanks for your prompt reply. You are amongst very few candidates who believe in this kind of mass interaction through a blog.

    Now, I did stay in Nashik city for couple of months. The one major issue which I came across was the public transport. Our party agitated against the errant Auto drivers from Mumbai and Thane. In Nashik , not a single auto driver uses the meter, rather the passengers are charged a whopping three to four times the fare which is generally charged for the same distance traveled using an electronic meter in Mumbai or Thane.
    Also the frequency of the Nashik municipal transport buses is not enough at all .

    I truly understand that the above issues might not be solved at the lok sabha level. But as a party representative would you please be able to shed some light on the above issue?

    Sincerely
    Sanket Babre

Leave a Reply