Click here to read in English

१. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनपा मध्ये सत्तेत येण्याआधी नाशिक महानगर पालिकेची वाटचाल जळगाव आणि कोल्हापूर महानगर पालिकेच्या दिशेने होती. महापालिकेला तब्बल ६५० कोटी रुपयांची देणी द्यावयाची होती. मात्र नाशिकच्या सुज्ञ नागरिकांनी योग्य वेळी निर्णय घेऊन मनसेच्या हाती सत्ता सोपविली. त्यामुळे नाशिक महापालिकेचे तारू बुडता बुडता वाचले.

२. आम्ही सत्तेत आलो आणि जकात बंद होऊन एलबीटी सुरू झाला, यामुळे मनापा च्या उत्पन्नात मोठी तुट निर्माण झाली मात्र तरीही आम्ही न डगमगता मोठया हिमतीने उत्पन्न वाढीचे वेगवेगळे पर्याय निर्माण केले आणि मनापा चे अवघ्या ७५० कोटीचे वार्षिक अंदाजपत्रक वाढवून तब्बल ११७० कोटींवर नेले. मिळणाऱ्या उत्पन्नातून ३०% उत्पन्न हे कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होते. शहरातील सुमारे १६००० मालमत्ता अशा होत्या ज्यांचा मालमत्ता करच भरला जात नव्हता. त्या आम्ही शोधून काढल्या. यामुळे मनपा च्या उत्पन्न वाढीस हातभार लागला. एलबीटीतून पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसताना सुद्धा आम्ही हे करून दाखवले.

३. नाशिक शहराच्या पायाभूत विकासासाठी खालीलप्रमाणे निधी खर्च केला(झाला) :-

Capital-investment-made-in-infrastructure

 • आर्थिक वर्ष २००९ – २०१० : रु २६६ कोटी
 • आर्थिक वर्ष २०१० – २०११ : रु १९४ कोटी
 • आर्थिक वर्ष २०११ – २०१२ : रु २३२ कोटी
 • आर्थिक वर्ष २०१२ – २०१३ : रु ३३२ कोटी
 • आर्थिक वर्ष २०१३ – २०१४ : रु ५८८ कोटी
 • आर्थिक वर्ष २०१४ – २०१५ : रु ८२८ कोटी

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेली हि गुंतवणूक भविष्यातील नाशिक शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन केली असून, त्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे . शहर स्वछ आणि सुंदर म्हणून ओळखले जाईल. नाशिकचा सर्वांगीण विकास करण्याचे सुतोवाच आम्ही केले होते आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नाशिक शहराची वाटचाल आता भविष्यातील मेट्रो सिटीच्या दिशेने सुरु झालेली आहे.

४. आम्ही सत्तेत येण्या आधी रस्ता तयार झाल्यानंतर दुरुस्तीची जबाबदारी त्या ठेकेदारावर फक्त १ वर्षाची होती. त्यामुळे रस्त्याची कामे व्यवस्थित होत नव्हती, आम्ही हा कालावधी तीन वर्षांचा केल्याने ठेकेदार रस्त्यांची कामे चांगली करू लागली आहेत. त्याचप्रमाणे आम्ही गुणवत्तेच्या बाब्तीतही कुठलीच तडजोड न करता निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना दंड व काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कामे चांगली होऊ लागली आहेत . २०१५ पर्यंत शहरातील सर्व म्हत्वाचे रस्ते तसेच रिंगरोड आणि रेडीयल रोड तयार होऊन एकमेकांना जोडले जातील. शहरातील सर्व महत्वाचे रस्ते रुंदीकरणाची (४ लेन) मोहीम हाती घेण्यात आली असून नजीकच्या काळात शहरातील सर्व रस्ते रुंद झालेले असतील. पेठ रोड आणि दिंडोरी रोड लवकरच ४ लेन होणार आहे. यामुळे शर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. शहराच्या हद्दीलगत असलेल्या ग्रामीण भागातही चांगले रस्ते, वीज , पाणी आदी सुविधा देण्याकडे आमचा काळ आहे. काही ग्रामीण भागांमध्ये आत्ता सुंदर आणि चांगले रस्ते तय्यार झालेले आहेत, उरलेल्या गावांमध्ये लवकरच काम चालू झालेले आहे.
SINHASTHA_14022014_002

SINHASTHA_14022014_003
५. गरिबांसाठीच्या घरकुल योजनेंतर्गत आम्ही आतापर्यंत १५०० लाभार्थींना घरकुलांचे वाटप केले असून १००० घरकुले वाटपासाठी तयार आहेत. ती लवकरच गरीब लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येतील. आमच्या येण्यापूर्वी घरकुल परीयोज्नेत मोठ्ठे गैरव्यवहार झाले होते, पण आम्ही हि परियोजना अत्यंत योग्यरीत्या चालवून गरिबांना घर मिळवून दिले.

६. थोड्याच दिवसात आम्ही शहराच्या अगदी मध्य भागी आयटी पार्क सुरु करणार असून, त्यामधील ऑफिसेस उद्योन्मुख उद्योजकांना अतिशय अल्प भाड्याने देण्यात येतील. त्याचप्रमाणे येथे मोफत इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. साधारणपणे १०० – १५० गाळे ह्या IT पार्क मध्ये असतील, काही छोट्या IT कंपन्यांच्या म्हणण्या प्रमाणे, त्यांचे कर्मचारी अंबड किंवा त्यापुढे जाण्यास तय्यार नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी कॉलेज रोड जवळच व्यवस्था करण्यात येत आहे.

७. महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीमध्ये औद्योगिक वसाहतींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तिथे चांगल्या सुविधा पुरविणे हे आमचे कर्तव्य आहे. सातपूर आणि अंबड येथील औद्योगिक वासाहातीन्म्ध्ये रस्ते व सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी ४५ कोटी रूपांची कामे प्रस्तावित आहेत. त्याचप्रमाणे येथे २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही सर्व कामे २०१५ मध्ये पूर्ण होतील.

८. नाशिक हा महाराष्ट्रातील एक मात्र शहर आहे, जिथे दररोज कित्येक तास पाणी पुरवठा केला जातो, इतर कुठल्याही शहराला असले सुख नाही.

९. नाशिक मनपा ही SAP आणि ERP ची सर्व मोड्युल्स वापरणारी महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका असून यामुळे व्यवहारात पारदर्शकता आली आहे, त्याचप्रमाणे अनावश्यक मनुष्यबळाची आवश्यकता राहिली नाही.

१०. महाराष्ट्रातील महानगर पलीकांपैकी नाशिक महानगरपालिका ही एकमेव अशी महानगरपालिका आहे कि ती १००% सुरक्षित Cloud hosting solution, चा वापर करते.

११. नागरिकांना सर्व प्रकारचे कर आता online क्रेडीट कार्ड वापरून अथवा नेट बँकिंग च्या सहायाने भरता येतात. यामुळे जनतेची मनपा पर्यंतची अनावश्यक पायपीट होणार नाही.

१२. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासठी हेल्पलाईन सुविधा सुरु करण्यात आली असून १४५ व ०२५३२५७३१५१ या क्रमांकावर आतापर्यंत आम्हाला सुमारे १२००० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी बहुतौंसी सोडविल्या गेल्या आहेत.

१३. शहर डास मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु असून ड्रेनेज तसेच एक्झोस्ट पाईपला जाळी बसविल्यास डास निर्मुलनास मदत होणार आहे. हे काम मनपा च्या कर्मचार्यांकडून अत्यंत कमी दरात करून घेता येते, १४५ व ०२५३२५७३१५१ वर फोन करून आपण मनपा च्या कर्मचार्यांना बोलावून घेऊ शकता आणि आपल्या घरातील किंवा आपल्या बिल्डिंग मधल्या सर्व एक्झोस्ट पाईप आणि चेम्बरला जाळी बसवून घेऊ शकता, ज्यांनी ज्यांनी ह्या सुविधेचा वापर केला आहे, त्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये डास नाहीसे झाले आहेत. वेळोवेळी शहरात फवारणी केल्याने सुद्धा मागच्या २ वर्षात दासांचा उपद्याप कमी झाला आहे.

१४. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळात आम्ही आणखी एक महत्वाची सुविधा नागरिकांसाठी सुरु केली असून ती म्हणजे फोटो तक्रार. तुमच्या परिसरातील ड्रेनेज फुटले असेल , नळ गळती असेल अथवा रस्त्यावर झाड तुटून पडले असेल तर महानगरपालिकेच्या हेल्पलाईनला फोटो पाठविल्यास आमचे कर्मचारी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन ती समस्या सोडवतात.

१५. शहरातील ८०% मालमत्ता आम्ही जी.आय.एस(GIS Mapping) म्याप्शी जोडल्या आहेत. लवकरच १००% मालमत्ता आम्ही जी.आय.एस(GIS Mapping) म्याप्शी जोडणार आहोत.

१६. मनपा मधील सर्व कर्मचार्यांना सर्वच प्रकारची कामे करता यावीत म्हणून त्यांना प्रशिक्षित करण्यत येत आहे. यापूर्वी प्रत्येक कर जमा करण्यासाठी वेगवेगळी माणसे जात असत, मात्र आता एकच व्यक्ती सर्व प्रकारचे कर जमा करते.

१७. पाणी बिलाच्या बाबतीत हि आम्ही रीडिंग घेतल्यावर जागीच बिल देण्याची व्यवस्था केली आहे.

१८. नाशिक मनपा मध्ये आता वेगळी अतिक्रमण निर्मुलन कार्यपधति तय्यार करण्यात आली आहे. आमच्या सर्व विभागांना आम्ही अतिक्रमण निर्मुलन करण्याचे शिक्षण दिले आणे आणि सर्व विभाग अतिक्रमण निर्मुलन करण्यात सक्षम झाली आहेत.

१९. शहरात प्रशस्त उद्याना बरोबरच मुलांना खेळ खेळण्यासाठी २५ कोटी रु खर्च करून क्रीडांगणांची निर्मिती करण्यत येत आहे.

२०. मनपा च्या सर्व शाळांमध्ये शिक्षण विषयक उपक्रमांबरोबच सामाजिक तसेच क्रीडा उपक्रम सुरु केले आहेत. शालेय विद्यर्थ्याना गणवेश, वह्या , पुस्तके, बूट ,मोजे आदी साहित्य वेळेत उपलब्ध करून दिले जात आहे. अंगणवाड्या मध्ये माध्यान्ह भोजन व्यवस्था केली असून गत तीन वर्षा पासून दर्जेदार अन्न पुरवठा केला जात आहे.

२१. शहरातील ड्रेनेज साफ करण्याची क्षमता १०० एमएलटी वरून २४० एमएलटी करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात हि श्रमता ३१० एमएलटी पर्यंत पोहचेल आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर्णपणे गटारीतील प घाण पाण्यापासून मुक्त करता येईल. येत्या दीड वर्षात आपल्या STP प्लांट्स ची श्रमता वाढवून वर्ष २०४१ पर्यंत लागणाऱ्या श्रमते इतपत होणार आहे. आम्ही लवकरच गंगापूर पासून ते टाकळी पर्यंत गोदावरीला समांतर पाईलाइन टाकणार आहोत. जुना गंगापूर आणि पंचवटी येथील STP प्लांट्स वर शहरातील संपूर्ण गटारीतील पाणी स्वछ केले जाणार.

MASTER-PLAN-MAIN-KEYPLAN1

२२. २ वर्षांपूर्वी आम्ही सत्ता हाती घेतली तेव्हा गोदावरीला पाणवेलींचा विळखा होता. सर्वत्र पाणवेलींचे साम्र्राज्य होते. त्यसाठी आम्ही पाण्यावरची घंटागाडी हा प्रकार सुरुकरुन गोदावरी स्वच्छता मोहीम हाती घेतली. आजमितीला गोदावरी पाणवेली मुक्त झाली आहे. भविष्यात त्यसाठी खास रोबोट खरेदी करण्याचा आमचा मानस आहे.

२३. शहरातील सांडपाणी इंडिया बुल्सला देऊन त्या बदल्यात एसटीपी स्टेशनसाठी ३० कोटींचा प्रस्ताव दिला होता, मात्र इरीगेशन खात्याकडून त्याला परवानगी मिळाली नाही.

२४. वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून आम्ही शहर विकास प्राधिकरणाला बहुमजली पार्किंग कॉम्प्लेक्स निर्मितीसाठी प्रस्ताव दिला आहे मात्र त्यालाही अद्याप परवानगी मिळाली नाही.

२५. आम्ही आत्ता पर्यंत अनेक जागी समाजमंदिरे आणि निवारा गृह यांची उभारणी केली आहे.

२६. लहान मुलांना रहदारी(Traffic) मध्ये गाडी चालवण्याची समाज यावी, यासाठी आम्ही शहरात ठिकठिकाणी traffic पार्क सुरु करणार आहोत, आपल्या भविष्यातील नागरिकांना तरी शिस्तबद्ध गाडी चालवण्याची जाणीव असावी हाच यामागील उद्देश. जे वयस्कर न शिकताच गाडी चालवण्याचा परवाना मिळवून बसले, त्यांचासाठी विशेष काही करणे कठिण आहे.

२७. लहान व्यावसायिकांना सुरक्षितपणे व्यवसाय करता यावा म्हणून स्पेशल हॉकर्स झोन निर्माण करण्याचे काम सुरु झाले आहे. २० झोन्स मध्ये १५ – २० हॉकर्स झोन तय्यार करण्यात येत आहे. ह्यामुळे शहरातील रहदारीला आणि सुंदरतेला होणारी अडचण कमी होणार.

२८. शहरात महिलांसाठी अनेक ठिकाणी स्वच्छता गृह तसेच शहरालगत च्या ग्रामीण भागात शोचालाय बांधणीला प्राधान्य दिले आहे. येत्या कूम्भमेळ्यापर्यंत ८० नवीन स्वच्छता गृह तय्यार केले जातील, प्रत्येक स्वच्छता गृहात २० शोचालाय असतील.

२९. भविष्यकाळातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अनावश्यक जोडण्या खंडित करून पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. यामुळे वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचत आहे.

३०. वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन शहरात ८ नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहेत. शहरातील सर्व सिग्नल सोर उर्जेवर चालतात, कुठल्याही सिग्नलला महावितरणच्या विजेची गरज राहिलेली नाही.

३१. रामकुंडाच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून तेथे दिव्यांची खास व्यवस्था केली आहे. शहरातील सर्वच दिवे बदलून त्याजागी एलईडी बसविण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ६५% वीज बचत होणार आहे, त्याच्याने वार्षिक १८ कोटी रुपयांची बचत होणार.

३२. आम्ही Bio-Methane Gas plants सुरु करणार आहोत त्यातून रोज १५००० युनिट वीज निर्माण करता येईल. हे Bio-Methane Gas plant कचऱ्यावर चालतील.

३३. शहरात तीन ठिकाणी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारणीचा आमचा मानस आहे . यामुळे घाण कचरा तसेच मेलेली जनावरे यांची सहज विल्हेवाट लावली जाणर आहे.

३४. उंटवाडी पूल आणि संगम पूल मागील १० वर्षांपासून तय्यार आहे, पण मूळ जमीन मालकांचे प्रश्न फक्त आम्हाला सोडवता आले. लवकरच हे दोन्ही पूल चालू होतील आणि शहरातील पप्रमुख रस्त्यांवरची रहदारी कमी हॊइल.

३५. मुकणे धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्याचा आमच्या प्रस्तावाला भारत सरकारने मंजुरी दिली असून आगामी तीन वर्षात २२० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण होणार आहे . यामुळे सातपूर तसेच पाथर्डी फाटा या भागातील वसाहतींना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.

३६. नाशिक महानगरपालिका महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विध्यापीठाबरोबर एक करार करण्यात आला आहे, महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आरोग्य विज्ञान विध्यापीठाचे उच्च शिक्षित तज्ञ डॉक्टर्स(PG students) सेवा देतील. यासाठी वर्षाला १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे बिटको रुग्णालयाचे संपूर्ण नुतनीकरण करण्यात येत असून त्यसाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

३७. मोफत वाय-फाय(WI-FI) सुविधा प्राथमिक अवस्थेत असून, पायलट प्रोजेक्ट लवकरच सुरु होणार आहे. ह्यासाठी संपूर्ण प्रोजेक्टसाठी दोन कोटी रुपये निधी राखून ठेवण्यात आला असून Bandwidth स्थानिक डाटा सेंटर कडून मोफत पुरविण्यात येणार आहे.

३८. तरुण आणि वृद्धांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही चार ओपन जिम सुरु केल्या असून लवकरच अजून ८ जिम सुरु करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक जॉगिंग ट्रेक निर्माण करण्यात येत आहेत.

३९. शहरातील अडचणीच्या जागी कचरा उचलण्यासाठी आम्ही लहान स्वरूपाच्या घंटा गाड्या लवकरच सुरु करत असून स्थानिक मनसेच्या नगरसेवकांच्या निधीतून हे काम सुरु होत आहे त्याच प्रमाणे जुन्या घंटागाड्या हि बदलण्याचे विचाराधीन आहे.

४०. महामार्ग क्र ३ वर सध्या उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलामुळे त्यालगतच्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असून नवीन उड्डाण पुलाबात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी प्राथमिक चर्चा झाली आहे. मी स्वत NHAI बरोबर चर्चा करून हा विषय मार्गी लावणार आहे, त्यांच्याकडून काही छोटे उड्डाण पूल बनवून घेणे अत्यावश्यक आहे.

४१. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आणि आपल्या नागरिकांना दाखवण्या हेतूने आम्ही काही सुंदर रस्त्यांचे निर्माण करत आहोत, आसारामबापू पुलापासून बनवण्यात आलेले रोड ह्यातीलाच एक आहे, अशे अत्याधुनिक आणि सुंदर रस्ते आम्ही ठिकठिकाणी बनवणार आहोत.

 1. Ketan C says:

  We excepted a lot from MNS , What Nashikars got is tie tie fish , only thing we got godapark dat too funded by RIL , basic infrastructure is still issue , roads are worst in nashik , in last kumbh mela nashik had a make over , i dont think it will happen this time, MNS has cheated nashikars know we nashikars will show our power ….

  • Dr. Pradeepchandra Pawar says:

   Dear Ketan !

   Work has started this time and NMC has initiated most of the work from its own funds. you can see all roads near the corporation limit from all sides are getting developed and widened. funds for Kumbh Mela have not been released by the State government till now, as they want the work to happen after the Assembly election, so that MNS and BJP will lose their position in Nashik. If you are smart enough, then you need to give a smart answer to such State government.

   • Ketan C says:

    Sir agreed with you but dont u think the development work just started during election time, sorry to say but the roads are in worst conditions I have seen in nasik, everytime Mr Thackeray visits Nashik he visits godapark as if it is only issue in nasik , the main issues are pending pollution of godavari no one is interested because there might be less money there, dont u think first making godavari pollution free shall be the agenda

 2. sanchit s kulkarni says:

  That sounds fine enough, but Dr. I think u won’t b able to reach all Nashikkars through ur blog,
  These things have to b made public by some other means…
  Opposition has succeeded to some extent making an impression that mns is unsuccessful..
  Dr. You have to do it….
  We are with manse…
  All The Best….

 3. Dr. Pradeepchandra Pawar says:

  Dear Sanchit !

  You are absolutely right. it is important to have a economical media option to reach out to the public, but unfortunately the Print Media is not entertaining us at this point of time, as they all have got huge package from the other rich and corrupt politicians. You can see how the media is projecting such people as “Vikas Purush”, while the fact is that they have done absolutely nothing for Nashik. Nashik – Mumbai highway work was initiated by Mr. Nitin Gadkari during BJP-Shiv Sena rule and the project was executed by NHAI. if some politician goes and does the inaguruation, then it doesn’t mean that he has done the project.

  Same is the case about the Boat Club, they spent crores of rupees to bring Salman and next day there was nothing left at the site of Boatclub. now they want people to vote for them and they will complete the Boat Club once they win both the elections. If people decide to support the honest and non-corrupt Leaders, then development will automatically happen. Kumbh Mela have not been released by the State Government yet, but we have started the Road development work from our funds. State government did similar thing when we had a proposal from Indiabulls to buy our Sewage water in exchange of 30Cr payment, but the Irrigation department refused the proposal for unknown reasons.

  next government in the Centre and State will involve our Team and NDA, so we won’t have such biased view for any of the Districts of Maharashtra. everyone should get equal opportunity for growth and their share of funds should be given to them.

 4. Mandar Dashputre says:

  Why people cannot think -if they have voted for other parties who have done absolutely nothing in nashik in so many years, why they can’t give some time to Raj Saheb. People just want quick results, they should keep patience and support MNS. Also, I believe Shri. Pradeep dada, that this blog should be brought to public by way of newspaper, i strongly believe it will have huge impact. Ani nishchitach raj sahebanchi sabha jhalyawar hyacha ekatrit prabhav nakki padnar.. Ani tyatunahi jevha modi ji n cha sarkar yeil, tevha nashikcha nischitpane kayapalat honar..

 5. sagar says:

  Saheb….. 2varshat ektari kam purn jahla pahije hota. Raj sahebancha awadta vishay mhanje goda park. Pan tumhi sadhi survat dekhil nahi karu shakle.
  Atikraman cha bolal tar nashik road yeun bagha. Mhanje tumhala kalel atikraman mohim kiti jorat ahe te.
  raj sahebani dum dilyawar 2divas kadam saheb firle photo kadat. Nantar kai?
  Fakt vikasachi passion asun chalat nahi …..kam karavun gheta ala pahije.
  tasahi tumhala matdan karun amhi ajun 1 risk ghenarach ahe.
  Jai mns..
  Best of luck

  • Dr. Pradeepchandra Pawar says:

   Dear Sagar ! सध्या आचारसंहिता लागल्यामुळे अतिक्रमण निर्मूलनाचे काम थांबवावे लागले. मनपा कर्मचाऱ्यांकडून खासगी कंपन्यातील कार्माचार्यांसारखे काम करून घेता येत नाही, पण मागील २.५ वर्षात आम्ही त्यांच्यात भरपूर बदल आणला आहे. पुढच्या १.५ वर्षात तुम्हाला खूप मोठ्ठा बदल दिसून येईल.

 6. Gaurav Bhamare says:

  MNS walyanno Shahrat Aslele Sarv Circle (Vahtuk Bet) Khrab Zale Aahet..Kahipan karun tya kade Laksh Dya…& Nasik City Decorative Watnya Sathi Kay Plan Aahet ??

 7. Amit mali says:

  Well Appreciated

  This is what u did is only known bye few peoples who are reading this article online ,
  I voted MNS for that king of change , sadly people don’t know what the struggle MNS did to born from ground, Dr. My advise is to you is please find the way to reach all this information to the each people of nashik , Diff types of people have diff types of IQ so create diff kind of graphical animated video graphic and lots of comparison image of before and previous so they stop blaming MNS that they didn’t do anything in those years .. i really warn u that is the impact in peoples mind even in my home i explain them abt the income and other problems ans asked them to vote at least one time this time

  As i m love graphics i know how they fastly interact and make huge impression in small time instead of text .. hope you read this comment bye own , not bye any other who manage and comment or reply to peoples comment .. have a nice journey and my best wish with u

 8. Sudhir Shigwan says:

  I want to give answered to those people who only targetted MNS in Nashik (MNC). Those people didn’t know that others Municipal didn’t worked from many years. e.g. Mumbai Mahanagar Palika have in Shivsena, but in Mumbai there are many difficulties from so many years that i suffered from many years. I strongly believed that MNS will do very well in Nashik in future

 9. saurabh nath says:

  wa youths are suporting u….u had done gud job sir….bt i hve some suggetions for u nd all mns nasik team…dat is we know dat wht u did..bt all citizens doesnt knw the reality…..so i ll say u dat u nd ur team should show the works which is u hd done yet… sir some opposions nd newzpepers dosnt show ur nmc sucsess front of all citizens…so do something on dat problame… wish u all d best sir…u wll definetly win

  • Dr. Pradeepchandra Pawar says:

   Dear Saurabh ! Newspapers have got huge package from the existing MP and his family, so they are not entertaining any news from us. they are only allowing paid articles and we have very limited funds received in the form of donations to advertise on TV or in the print media. how can someone end corruption if you are expected to spend crores of rupees in elections ?

 10. Amit says:

  Dr saheb, you strongly need to put all this information in front of complete Maharashtra state.
  whenever we hear something incorrect/abusing (for no work done in nashik) from other peoples in Pune or other cities we feel bad for it as those peoples are lack of information. and the way peoples talks with unknowing hurts more for Raj Saheb.
  Thanks.
  All The Best.

  • Dr. Pradeepchandra Pawar says:

   You are absolutely right Amit ! We have limited budget, as Raj saheb tells his rich friends to invest their money in doing some or the other development work in the city, just like Godapark. We take very limited donations. Our belief is that to end corruption, one need to stop taking money from corporates and ask them to invest their money for betterment of people.

 11. mahesh says:

  dear dr pawar, tumchi che varti lihile aahe blog madhe te pratyakshat disat nahi aahe. vicahr ani kruti yancha mel basat nahi. je lok mhantat ki tyani nashik cha vikas baghitla aahe te kadhachit nashik madhe rahat nasave kiva ucchabhu vastimadhe rahat asave. nashik road, cbs, shalimar, rk, malegaon stand, panchavati, dwarka, line khup mothi aahe.. (samajne walo ko ishara kafi he). na raste nit pata pat atikraman vadhat aahe ani kadhayla survat kadhi tar raj saheb mahnale tevha 2 varshe jhalyanantar. wa very good. shahramadhe na stiya surakshit na lahan mule. riksha chalak kiti mujor jhale he tar mahit nasel tumhala. yavar tumhi mhanal ki he vishay aamchya akhatyaritya yet nahi. te hi barobar aahe. kahi uttar nahi na. aamhi raj sahebana follow karto pan apeksha purn hot nahi ani nirasha hote.

  • Dr. Pradeepchandra Pawar says:

   Dear Mahesh ! it has taken some time for us to initiate major development projects, as the Corporation had huge amount of payables to give to vendors and contractors. later on we initiated Tenders with deferred payment option, but none of the Contractors came forward to bid. you can now check that Road development and water supply lines are being laid in each and every colony and corner of nashik. People have given decades to Congress, but they are not ready to give us even few years time properly. I hope you will spread awareness amongst your contacts.

 12. Vardhan Sohani says:

  Pradeepji, immensely happy that at least somebody of us has taken the efforts to jot down the work that has been done till date. Why not publish this in social media. just drop these points on any Raj Thackeray page and it will reach lakhs of people within few hours.

  nevertheless, many congratulations and all the best for future….

  Desperately want to See you as Khasdar Dr. Pradeepchandra Pawar….
  Best Regards,

  Vardhan Sohani,
  MNS, Karad

 13. Balaji P. says:

  Dear Sir,

  I am very happy to see this blog. Now a days, I am observing people especially all opposition parties are criticizing MNS over Nasik development issue. Unfortunately nobody really want to know ground reality. Your blog is simply profound answer all the unnecessary criticism. MNS should bring all these small but meaningful achievements to world. Make it public through all possible means. Let people understand we are not in the politics of development i.e. Navnirman.

  One suggestion – If you can provide FB & twitter links to your blog, it would be great deal. At least MNS supporters like me can share it on social networking sites. We want blog this like should go viral on all social media.

  All the very best for your Loksabha campaign.

  Regards,

  Balaji

 14. Mayur Shinde says:

  Aamdar Nitin Bhosle yani tyanchya matdar sanghat banner laun tarunana tenychya office madhe nav nondani karnyas sagitale. mazaya kahi mitrani nav nondani keli tyanna job bhetla. mala ase vate ki maharashtra til ek mev aamdar astil je asha prakar cha upkarm rabhavila. this time its my 1st vote it is for you.

 15. Walmik says:

  Is there any plan for IT development.
  there are many collages are invented to facilitate the hi fi education. But do we have that kind of jobs in nasik.
  all production companies are located in Nasik.
  why we are not talking on this issue, does MNS has any plan for this. Can Raj saheb will talk on this.
  There is no doubt that Raj saheb is very future oriented person. See pune, Mumbai how many IT companies are there.
  Can nasik youth will have this kind of atmosphere in Nasik.
  I have one suggestion to MNS, work on IT projects, because future is all about IT and remember if IT grows everything grow and one day will come that people will only vote to MNS if they facilitate IT projects.
  Nasik has good land and atmosphere to built the IT projects. Can nasik will have INFOSYS, WIPRO, TCS, TECH MAHINDRA, COGNIZANT, PERSISTENT, and other plants in nasik.
  Please do something I have seen graduate people are driving auto rickshaw in nasik.

  • Dr. Pradeepchandra Pawar says:

   Hi Walmik ! Generating employment for 5 Lakh youth of Nashik is my first priority. Accenture is coming to Nashik and I am in touch with 2 big IT companies from USA. I will take every possible step to bring some large IT companies in Nashik with the help of Raj saheb.

Leave a Reply