दरवर्षी पावसाळ्यात आपल्या शहराचे रस्ते खराब होतात, मी माझ्या वेयक्तिक स्तरावर ह्या विषयावर भरपूर अभ्यास केला आणि काही महत्वाच्या गोष्टी मला आढळून आल्या. मागच्या महिन्यात पाऊस पडला तेव्हा मी एका अवजड ट्रकच्या मागे जात असतांना त्याच्या मागच्या चाकांखाली डांबरी रस्त्याचे होत असलेले नुकसान पहिले, माझ्या डोळ्यादेखत त्या ट्रकने रस्त्यात कित्येक खड्डे करून टाकले. मी माझ्या मित्रांकडून अधिक माहिती घेतली असता माझ्या लक्षात आले की २० टन पेक्षा जास्त वजन असलेले कित्येक ट्रक आपल्या शहरात दररोज येतात, पण पावसाळ्यात ह्या अवजड मालवाहतूक करणाऱ्या ट्रकांना शहरात येण्यापासून थांबवल्यास आपल्या रस्त्यांचे होणारे कित्येक कोटीचे नुकसान आपल्याला वाचवता येईल. परदेशात अवजड वाहनांना शहरात घुसण्याची परवांगी नसते, त्यामुळे त्यांच्याकडे कित्ती जरी पाऊस पडल्यास रस्त्यांमध्ये खड्डे पडत नाही. आपल्या शहरात पावसाळ्यात २० टन पेक्षा जास्त वजन घेऊन येणारे काही मोजके २०० – ३०० ट्रक असतील, पण रस्त्यांचे झालेले नुकसान हे २०० – ३०० कोटीच्या दरम्यान असते. म्हणजे प्रत्येक अवजड ट्रक आपले १ कोटीचे नुकसान करतो. शहरात स्टील आणि रेती मागवणारे बांधकाम व्यावसायिक ह्या अवजड वाहनांसाठी जबाबदार आहेत. येत्या २ महिन्याच्या आंत आपल्याला काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर तय्यार होत असलेले नवीन रस्ते जुलै महिन्यापासून पुन्हा खराब होऊ लागतील.

truck-falls-in-its-own-pit

महापौर साहेबांना आणि मनपा आयुक्त साहेबांना माझे प्रस्ताव खालील प्रमाणे आहे :-

१. शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांच्या मधोमध इलेक्ट्रोनिक वजनकाटे बसविले पाहिजे. शहरात येणाऱ्या कुठल्याही मालवाहतूक वाहनाच्या कुठल्याही एका चाकावर जर २ टन पेक्षा जास्त भार असेल, तर त्या ठिकाणी सायरन वाजायला पाहिजे आणि त्या अवजड ट्रकला तिथेच थांबवले पाहिजे. ह्यात पोलिसांनी किंवा मनपा कर्मचाऱ्यांनी कुठलेही कारण बनवून त्या वाहनास परवांगी द्यायला नको, म्हणून CCTV कॅमेरे बसवले पाहिजे आणि त्याचे कंट्रोल रूम मनपा च्या राजीव गांधी भवनात असले पाहिजे, सायरन वाजल्याने मनपा मध्ये देखील माहिती पोहोचली पाहिजे.

सध्या आचारसंहिता असल्यामुळे हे काम आपल्याला ताबडतोब करणे शक्य नाही, पण आपले समर्थन लाभल्यास आयुक्त साहेबांना ताबडतोब हि योजना राबवण्यासाठी आपण हट्ट धरू. तसे केल्यास ते जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी घेऊ शकतील. कुठल्याही परिस्तिथित आपण हि योजना जून महिन्यापर्यंत राबवली पाहिजे. आपण माझ्याशी सहमत असल्यास मला कळवा.

Leave a Reply